पुण्य वार्ता
श्रीरामपूर- तृतीयपंथीयांनी देखील सामान्य जना प्रमाणे स्वाभिमानी व स्वावलंबी आयुष्य जगावे याकरिता तृतीय पंथीय सेवा संघ श्रीरामपूर च्या अध्यक्षा गुरु पिंकी शेख व दीक्षा पिंकी शेख नेहमीच प्रयत्नशील असतात.
याच संकल्पनेतून त्यांनी तृतीयपंथीयांना रोजगार मिळावा याकरिता डॉर्फ केटल केमिकल्स इंडीया यांच्या सी एस आर पुढाकरातून व सप्रेम व तृतीय पंथीय सेवा संस्था श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राईड प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
यामध्ये सप्रेम संस्थेमार्फत जागेला कुंपण, २० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टंकी, बोरवेल करण्यात आले आहे आणि या प्रकल्पाला जोड म्हणून तृतीय पंथी समुदाय कार्य करत आहे यासाठी शेती व जोडीला शेळीपालन सुरू करण्याचा धाडसी बेत आखला.
या कार्यामध्ये सप्रेम सामाजिक संस्था कल्याण यांनी डॉर्फ केटल केमिकल्स चे सी एस आर अंतर्गत तृतीयपंथीयांना शेतीमध्ये एक सुसज्ज गृहनिर्माण करण्याचे काम हाती घेतले. या कार्याचा शुभारंभ दिनांक 19 फेब्रुवारी 2025 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रोजी चितळी ता. राहता येथे झाला.
याप्रसंगी सप्रेम संस्थेचे डॉ. प्रकाश गायकवाड, डिग्निटी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती प्रकाश गायकवाड सप्रेम संस्थेचे प्रकल्प समन्वयक हिमांशू लोहकरे. तृतीय पंथीय सेवा संघाचे अध्यक्ष गुरु पिंकी शेख व दीक्षा पिंकी शेख या उपस्थित होत्या या सर्व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन चा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पिंकी शेख यांनी तृतीय पंथीयांना स्वावलंबी बनवणारा हा भारतातील पहिला प्रकल्प असल्याचे सांगितले. दीक्षा पिंकी शेख यांनी यावेळी सप्रेम चे व डॉर्फ केटलचे आभार मानले तसेच हा प्रकल्प भविष्यात अनेकांना आधार देणारा ठरेल असे गौरवउद्गार काढले.
भविष्यात तृतीयपंथीयांसाठी याप्रकारे काम करण्या बाबत व योग्य मदत मार्गदर्शन करण्यासाठी सप्रेम नेहमीच पुढे राहील याची ग्वाही प्रकल्प समन्वयक हिमांशू लोहकरे यांनी दिली.
