पुण्य वार्ता
मुख्य संपादक
डोंगरगाव,अकोले
अकोले तालुक्यातील आढळा विभागातील डोंगरगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आधी मंडळाची 69 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन कोंडाजी नामदेव उगले यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.
यावेळी प्रथम अध्यक्षपदाची सूचना अमोल उगले यांनी मांडली त्याच अनुमोदन गणेश उगले यांनी दिले. यावेळी अहवाल सालात विविध क्षेत्रातील दिवंगत झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभेला सुरवात झाली.
मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचन संस्थेचे सचिव बाळासाहेब मोरे यांनी केले. सन 2023-24 सालाचे वार्षिक अहवाल तेरीज ताळेबंद नफा तोटा व व्यापारी पत्रके सभेत वाचन केले.2025-26 साला करता सभासदांची कमाल मर्यादा पत ठरवून बँकेकडे कर्ज मागणी करणे व तसा अधिकार संचालक मंडळात देणे, सन 2024 ते 2025 साला करिता अंदाजपत्रकास मंजुरी देणे, सन 2024 ते 2025 या साला करिता कॅश क्रेडिट मागणी करण्याचा अधिकार संचालक मंडळास दिला, सन 2022 ते 2023 लेखा परीक्षण अहवाल वाचून नमूद करणे व मागील दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे या विषयावर चर्चा झाली सन 2024 ते 2025 या सालासाठी वैद्यनिक लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षक नेमणूक करण्याचा अधिकार संचालक मंडळास दिला.
संस्था सक्षमीकरणासाठी संस्थेने नवीन इमारतीमध्ये कॉम्प्लेक्स बांधून ते भाड्याने व्यवसायिकांना देऊन त्यात त्यांनी नवीन व्यवसाय सुरु करण्यात आला. त्या मुळे संस्थेचा उत्पनात वाढ होणार आहे.
माननीय अध्यक्ष साहेब यांच्या परवानगीने ऐन वेळी येणाऱ्या विषयांवर सभासदांनी भाग घेऊन चर्चा केली व त्याची उत्तरे संचालक मंडळाने समाधानकारक दिली.
यावेळी संस्थेचे चेअरमन कोंडाजी उगले, व्हाईस चेअरमन सौ कुसुम उगले,संचालक नानासाहेब उगले,चंद्रभान उगले,अनिल उगले,बंडू उगले,उत्तम उगले,निवृत्ती सरोदे,अशोक उगले,सौ मंदा उगले,दयानंद चिकणे,लक्ष्मण पवार,सरपंच दशरथ उगले सचिव बाळासाहेब मोरे,कॉम्पुटर ऑपरेटर नवनाथ उगले, धान्य विक्रेता पोपट उगले
या वेळी विठ्ठलभाऊ उगले,सरपंच दशरथ उगले, माजी सरपंच बाबासाहेब उगले,उपसरपंच अमोल उगले,एकनाथ गोर्डे,सुनील उगले,परसराम उगले, ज्ञानेश्वर उगले,सूर्यभान उगले,हरिभाऊ हांडे,गणेश उगले,राधाकिसन उगले,हरिभाऊ उगले,दशरथ उगले,सुदाम उगले,रमेश उगले,आण्णासाहेब उगले,
रावसाहेब उगले,किशोर उगले,निवृत्ती पानसरे,संदीप उगले,चंद्रभान उगले,सुरेश उगले,संतोष उगले,बाळासाहेब उगले,योगेश उगले,अमोल उगले, रवी घुले आदी
संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


