पुन्य वार्ता
पंढरपूर – “भेटी लागी जीवा माझ्या विठूराया” या भक्तिपूर्ण ओढीने संपूर्ण देशभरातून विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच चितळवेढे गावातील वारकऱ्यांचा पंढरपूर येथे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यात पश्चिम विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील यांच्या हस्ते विठुरायाच्या मूर्तीचे भेटवस्तू देऊन वारकऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार नागेश आदापुरे यांनी शाल, पुष्पगुच्छ व महाप्रसाद देऊन उपस्थित वारकऱ्यांचा सन्मान केला.
यावेळी बोलताना आदापुरे म्हणाले, “जिथे पिकते तिथे विकत नाही, संपूर्ण हिंदुस्थानाला विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते. भक्तगण विठूराया व रुक्मिणी माताच्या दर्शनासाठी आतुर असतात. दर्शनानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद हा त्यांच्या जीवनातील एक सार्थ अभिमान असतो.” महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला ही सेवा करण्याची संधी मिळणे, हीच खरी शिकवण असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात आनंदा बाबुराव आरोटे, सिताराम संतु आरोटे, मधुकर सहादु आरोटे, देवराम बबन आरोटे, आनंद रखमा आरोटे, विठ्ठल तुकाराम आरोटे, शिवनाथ विठ्ठल आरोटे, किसन भिका आरोटे, गं.भा. इंदुबाई आरोटे, सुमन मधुकर आरोटे, चंद्रकला देवराम आरोटे, सुमन आनंदा आरोटे आणि सुभद्राबाई मारुती आरोटे या मान्यवर वारकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पंढरपूरची ही संतपरंपरा आणि वारकरी संप्रदायाचे योगदान सतत प्रेरणा देणारे आहे. वारकऱ्यांचा असा सन्मान होत राहावा आणि त्यांच्या सेवा कार्याची दखल समाजाने घ्यावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

