पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी(सचिन लगड)-
अहमदनगर जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघ आयोजित हिंदी दिना निमित्त पुरस्कार वितरण समारंभ श्री साईबाबा कन्या मंदिर हॉल ५००रूमच्या समोर शिर्डी ता.राहाता येथे संपन्न झाला.
हिंदी विषयाचे असनारे सखोल ज्ञान तसेच गुणवत्ता लक्षात घेऊन अकोले तालुक्यातील सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे येथील प्राचार्य मधुकर मोखरे यांना आदर्श गुणवंत हिंदी अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगि हिंदी अध्यापक सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम पगारे,उपाध्यक्ष रमजान सय्यद,सचिव सुरेश गोरे, सहसचिव एकनाथ जाधव,विश्वस्त राजाराम टपले,खजिनदार बाळासाहेब नवले,डॉ. संजय दवंगे,मिलिंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य श्री.मोखरे यांनी
सत्यनिकेतन संस्थेच्या खिरविरे येथील सर्वोदय विदयालयात १९९६ ते २००१,
कातळापूर येथे २००२ ते २०१२
राजूर येथे २०१२ ते २०१७,
कातळापूर येथे २०१७ ते २०२२ या कालावधीत हिंदी विषयाचे अध्यापन केले आहे.
राजूर येथे २०२२ ते २०२३ या कालावधीत पर्यवेक्षक म्हणून काम पाहीले आहे.सध्या ते जून २०२३पासून खिरविरे येथे प्राचार्य पदाची धुरा सांभाळत आहे.
सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक, क्रीडा क्षेत्राची आवड असणारे व्यक्तीमत्व.ज्ञानदानाबरोबरच
शाळेतील गरीब मुलांना नेहमीच मदतीचा हात पुढे असतो.त्याचबरोबर
शाळेतील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना शिस्तीसाठी व अध्यापनासाठी नेहमी आग्रही असतात .
प्राचार्य पदाचा बाहू न करता पाचवी ते बारावी पर्यंत रोज मुलांशी वर्गात जाऊन संवाद साधून मनमोकळेपणे मुलांच्या शंका समाधान करणे व मुलेही मोकळेपणाने आपल्या समस्या अंतर न ठेवता मनमोकळेपणाने सांगतात व तितक्याच तत्परतेने समस्या सोडवण्याचे काम करत असतात.
स्वभाव अतिशय मितभाषी ,शांत, संयमी, मिस्कील पण विनोदी ,
सर्वांशी मित्रत्वाचे नाते जपणारे, प्रत्येकाला समजून उमजून हळुवारपणे जपणारे व्यक्तिमत्व. परखडपणे बोलणारी स्पस्टोक्ते तसेच पर्यटनाची,खेळाची,कलेची आवड ,विद्यार्थी,समाज प्रिय शिक्षक असे नावलौकिक असणारी व्यक्ती
२७ वर्षे अविरतपणे हिंदी, समाजशास्त्र विषयाचे अध्यापन करणारी व महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षामध्ये नेहमी पुढे असणारे व नेहमीच शंभर टक्के निकाल असणारे एक ज्ञानपीपासून व्यक्तिमत्त्व म्हणजेच श्री.मोखरे सर.त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेत जिल्हा अध्यापक सेवा संघाने दिलेला पुरस्कार खरोखरच वाखान्याजोगा आहे.या कार्याबद्दल सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख,सचिव एम.एल. मुठे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन सर्व संचालक,आजी,माजी प्राचार्य, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले आहे.
[आदर्श गुणवंत पुरस्कारामुळे विद्यार्थ्यांप्रती शैक्षणिक क्षेत्रात जबाबदारी अधीक वाढली आहे.माझ्या अध्यापन कार्यात निश्चितपणे अधिक योगदान कसे देता येईल हेच माझे मी कर्तव्य समजून ज्ञानदान करीत राहील-प्राचार्य मधुकर मोखरे]

