पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच अगस्ती हायस्कूल व अभिनव पब्लिक स्कूल अकोले या ठिकाणी पार पाडल्या.या स्पर्धेत जि.प. प्राथ. शाळा टाहाकारी शाळेने दुहेरी यश संपादन केले.
या स्पर्धेत शाळेचा लहान गट मुली खो-खो व मोठा गट मुले कबड्डी या दोन संघांनी तालुका पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त केला.या दोन्ही संघांची जिल्हास्तरासाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री आप्पासाहेब गडाख ,श्री.संतोष फोडसे ,श्री. नामदेव भांगरे , श्री. गोकुळ नेहे, श्री. गोरखनाथ धोंगडे, श्री ज्ञानदेव घोडसरे ,श्रीमती लता जगधने, श्रीमती भाग्यश्री एखंडे यांनी मार्गदर्शन केले. प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या या दोन्ही संघांचे अकोले तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री अमर माने साहेब, गटशिक्षणाधिकारी मा. श्री अभयकुमार वाव्हळ साहेब, समशेरपुर बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री गोवर्धन ठुबे साहेब, केळी रुम्हणवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती रोहिणी खतोडे मॅडम, टाहाकारी गावच्या सरपंच श्रीमती चांगुनाताई मेंगाळ ,उपसरपंच श्री बाळासाहेब नरहरी एखंडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, श्री संतोष दशरथ एखंडे, सर्व सदस्य,विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन ,व्हाईस चेअरमन,पालक व सर्व ग्रामस्थ या सर्वांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरावर यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

