पुण्य वार्ता
जगन्नाथ आहेर
गणोरे – ( प्रतिनिधी )
गणोरे येथील दुध दरा संदर्भात आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस असुन.या उपोषणाला बळ देण्यासाठी दोन्ही तालुक्यातील दुध उत्पादक एकवटल्याचे दिसत आहे.
आज शनिवारी दि ६ जुलै रोजी सकाळ पासूनच अकोले व संगमनेर तालुक्यातील जवळपास ११ गावे बंद असून शासनाच्या धोरणांवर निषेध म्हणून गणोरे गावासह आढळा खोऱ्यात आपले दुकाने बंद ठेवुन सर्व व्यवहार ठप्प झाले आहे.
गणोरे, हिवरगाव आंब्रे, डोंगरगाव पिंपळगाव निपाणी समशेरपुर वडगाव लांडगा गुंजाळवाडी सावरगाव पाठ विरगाव कळस मेंगाळवाडी आदी संगमनेर व अकोले तालुक्यातील 11 गावांनी दूध उत्पादकांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आज दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला. शासनाने तातडीने दूध उत्पादकांच्या मागणीचे दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे..दरम्यान शुक्रवार रात्री सात वाजल्यापर्यंत आढळा परीसर दोन तालुक्यातील दुध उत्पादक मोठ्या संख्येने अंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आपले मनोगत व्यक्त केले.शुक्रवारी दुपारी वंचीत अघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. रात्री खासदार भाऊसाहेब वाकचौरे, तालिका अध्यक्ष डाॅ.किरण लहामटे, गट नेते जालिदंर वाकचौरे उपोषण स्थळी दाखल होऊन आपल्या भावना व्यक्त करुन उपोषण कर्त्यांचे मनोबल वाढवले. आज सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शासणाने दुध दर वाढी संदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र अंदोलनासाठी गुपीत धोरण ठरविले आहे. या अंदोलनाचा केव्हाही उद्रेक होउ शकतो. आज दुपारी राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड हे गणोरे येथे बाजारतळावर उपोषणाला भेट देऊन तब्बेतीची विचारपुस केली.
कोट
“दुधदर वाढ हा प्रश्न राज्याचे अखतारीत आहे. २२ तारखेला अधिवेशनात विरोधी खासदाराची मोट बाधुन चर्चा घडवुन आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगुन दुध उत्पादकांचा रास्त प्रश्न आहे. शासन अनुदानासह ३५ रु द्यायला तयार आहे. पाच रुपयाच प्रश्न आहे. ४० रुपये शासनाने देण्यास हरकत नाही. तो देण्यास भाग पाडु. शासन वेळकाडुपणा करत आहे. शासनाने नाकर्ते पणा दाखवु नये. नको तो व्यर्थ खर्च टाळुन शेतकऱ्याला उर्जित अवस्था आणण्यासाठी सहकार्य करावे. पुढील काळात तुमचा कोणताही प्रश्न असुद्या तो माझा प्रश्न असेल.आपल्याला पश्चिमेचे पाणी अडविण्यासारखे भरपुर कामे करावयाचे आहे.”
खासदार भाऊसाहेब वाकचौरे
“तालुक्यातील प्रश्नासाठी अनेक नेत्यांन मी नडलो आहे.आपली जनता चांगल्या प्रश्नांसाठी अंदोलन करत असेल तर मी खुष आहे.शेतकरी महत्वाचा घटक समजुन शासनाला निर्णय घ्यावा लागेल.विधान भवनात शेतकऱ्यांच्या दुध दरा बाबद प्रश्न लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.”
आमदार डाॅ.किरण लहामटे.
” दुध व्यवसाय हा शेतीचा हमखास पुरक धंदा आहे.दुध दरा बाबद अंदोलना आणखी वेगळे उग्र रुप देता येईल परंतु अस नाही की उपोषण कर्त्या कडे दुर्लक्ष करणे. त्यांचीही आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आमदार साहेबांनी शेतकऱ्यांचा दुधाच्या संदर्भात तारांकित प्रश्न टाकला आहे.तो लवकरच चर्चेला येणार आहे. उसा प्रमाणे दुधाला एफ आर पी मिळाला पाहिजे. दुध उत्पादकांना त्याच्या कष्टाचे दाम मिळालेच पाहिजे. अनुदानाचा फायदा शेतकऱ्याला होत नाही.दुध उत्पादकाच्या थेट हमी भाव मिळावा.”
गटनेते जालिंदर वाकचौरे
उपोषण कर्ते शुभम याची तब्येत खालावली. आज आंदोलनाचा सहावा दिवस
गणोरे गावातील नागरिक आक्रमक होत सरकारी वैद्यकीय अधिकारी ह्यांनी २४ तास उपोषण स्थळी राहण्याचे सांगितले .
घटनास्थळी देवठाण प्राथमिक केंद्राचे डॉक्टर नागरे दाखल तसेच अकोले तालुका पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील हे तातडीने घटनास्थळी दाखल उपोषणकरते शुभम आंबरे यांची तब्येत खालावली असल्याने वैद्यकीय अधिकारी उशिरा आल्याने गावातील नागरिकांचा संताप अनावर प्राथमिक केंद्राचे डॉक्टर यांना तपासणी करण्यास नकार परंतु गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करून उपोषन कर्ते शुभम आंबरे यांना IV दिले.
ह्यावेळी अतिशय तातडीने अकोले तालुका पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील व मंडलाधिकारी कुलकर्णी ,कामगार तलाठी गोंदके हे घटनास्थळी दाखल झाले.

