पुण्य वार्ता
संगमनेर ( प्रतिनिधी ) गुणवत्ता पूर्ण शिक्षण असलेल्या अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असून मार्च 2025 एचएससी बोर्डाच्या परीक्षेमध्ये ज्युनियर कॉलेजचा निकाल 97.43% लागला असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य श्रीमती शोभा हजारे यांनी दिली आहे.
या निकालाबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य हजारे म्हणाल्या की, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. गुणवत्ता व उत्कृष्ट निकाल हे वैशिष्ट्य स्कूलने कायम जपले आहे. यावर्षी बारावी साठी 156 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती यापैकी 152 विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक कार्तिक बाळासाहेब साबळे याने मिळविला असून द्वितीय क्रमांक श्रेयश शरद वाळुंज याने मिळवला आहे. तर तृतीय क्रमांक साक्षी अजय थोरात हिने मिळवली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,व्यवस्थापक प्रा.व्ही.बी.धुमाळ, अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव, प्रभारी प्राचार्य शोभा हजारे, प्रा उदय करपे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे

