पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.नरहरी झिरवाळ यांनी माजी आदिवासी मंत्री स्व. मधुकरराव पिचड यांच्या निवासस्थानी भेट देत श्रीमती हेमलताताई पिचड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीत त्यांनी दिवंगत नेते मधुकरराव पिचड यांच्या आठवणींना उजाळा दिला.

ना.
नरहरी झिरवाळ हे स्व.मधुकरराव पिचड यांच्या अंत्यविधीला आले होते मात्र त्यांना दशक्रिया विधीला यायला जमले नाही म्हणून त्यांनी आज अकोले तालुका दौऱ्यात मुद्दामहून श्रीमती हेमलताताई पिचड यांची सांत्वनपर भेट आयोजित केली होती.त्यानुसार सोमवारी सायंकाळी त्यांनी पिचड यांच्या निवासस्थानी भेट देत हेमलताताई पिचड यांच्याशी संवाद साधला.दिवंगत नेते मधुकरराव पिचड यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत असताना तसेच संवाद साधताना मंत्री झिरवाळ भावुक झाले.संपूर्ण आदिवासी समाजामध्येच नव्हेतर राज्यात पिचड साहेबांची पोकळी कोणीही भरून काढणार नाही.त्यांची उणीव सतत भासत राहणार असल्याची खंत व्यक्त केली. आदिवासी समाजाच्या हितासाठी एकत्र राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.त्यावेळी आदिवासी समाजात जागृती नसताना पिचड साहेबांनी ही धुरा आपल्या खांद्यावर घेत समाजाच्या हितासाठी आयुष्यभर संघर्ष केला.राज्यामध्ये आमदार ,मंत्री म्हणून त्यांनी ज्या ज्या क्षेत्रांमध्ये काम केले ते आमच्यासाठी आदर्श राहील. निळवंडे धरणाचे शिल्पकार म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे असे त्यांनी सांगितले.त्यांचे चिरंजीव वैभवराव पिचड यांना आम्ही इथून पुढच्या काळामध्ये आमच्याकडून जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणाने केलं जाईल आणि त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी निश्चित मदत करू.पिचड यांनी आदिवासी समाजासाठी केलेले काम कोणीही विसरू शकणार नाहीत असा विश्वास या वेळी व्यक्त केले.
यावेळी भरत घाणे, सी.बी. भांगरे,गणपत भांगरे,उपसरपंच संतोष बनसोडे,गोकुळ कानकाटे,सुनील सारुक्ते,सरपंच सयाजी असवले,गंगाराम धिंदळे,पांडूरंग खाडे, अनंत घाणे,निलेश साकुरे आदी उपस्थित होते.माजी आमदार वैभवराव पिचड हे स्व. पिचड साहेब यांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी काशी येथे गेलेले असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही.
यावेळी सी.बी.भांगरे यांनी ना.नरहरी झिरवाळ यांचे या भेटीबद्दल आभार मानले. ना .झिरवाळ यांनी पिचड कुटुंबियांची सांत्वन केल्यानंतर आ.डॉ.किरण लहामटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी राजकीय पार्श्वभूमीवर चर्चा केल्याचे समजते.

विविध संस्थांनी / संघटनांनी केला ना.झिरवाळ यांचा सत्कार
आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री हे अगस्ति देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त तथा रोटरी क्लब अकोले चे पब्लिक इमेज असलेले हभप दीपक महाराज देशमुख यांच्या सुगाव बु.येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी हभप दीपक महाराज देशमुख यांनी व त्यांच्या परिवाराने त्यांचा वारकरी फेटा बांधून शाल,पुष्पगुच्छ व ज्ञानेश्वरी भेट देऊन सन्मान केला.तसेच यावेळी रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीने अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, सेक्रेटरी अमोल देशमुख, पब्लिक इमेज हभप दीपक महाराज देशमुख ,माजी अध्यक्ष अमोल वैद्य, सचिन देशमुख, सचिन आवारी ,निलेश देशमुख,अरुण सावंत आदीनी त्यांचा सत्कार केला व रोटरी क्लब च्या कार्यक्रमास येण्याची विनंती केली व ना.झिरवाळ यांनी कार्यक्रमास येण्याचे कबुल केले. तसेच यावेळी केमिस्ट असोसिएशनच्या वतीने अ, नगर केमिस्ट असोसिएशनचे सहसचिव सचीन शिंदे, अकोले तालुका केमिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष राजेश धुमाळ, सचिव महेश येवले, सदस्य अरुण सावंत, सचिन आवारी, माऊली आरोटे,डॉ.निवृत्ती लांडगे
यांनी सत्कार केला.यावेळी ना.झिरवाळ यांनी असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समाजावुन घेतले व सदर प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

सुगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत सरपंच सौ.अनुप्रीता शिंदे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, आबासाहेब देशमुख, महेश देशमुख,
ग्रामविकास अधिकारी सौ.काळे ,विकासराव वाकचौरे, प्रदीप देशमुख, शांताराम देशमुख, बी.डी.वैद्य, दत्तात्रय अस्वले, धामणगाव आवारी चे उपसरपंच गणेश पापळ
आदीनी त्यांचा सत्कार केला.
त्यानंतर हाॅटेल माऊली ला सदीच्छा भेट दिली त्याठिकाणी राजवर्धन देशमुख, नामदेव आरोटे,अमित वाकचौरे यांनी ना.झिरवाळ यांचा सत्कार केला.


