पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील केळुंगण या ठिकाणी नुकतेच 14 ऑगस्ट रात्रीच्या सुमारास रामचंद्र मांगे यांचे घराला अचानक लागलेल्या आगीमुळे सर्व होत्याचं नव्हतं झालं. संघर्षमय परिस्थितीत आतापर्यंत कमावलेलं डोळ्यादेखत नष्ट झालं.नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही.
अकोले तालुका केमिस्ट असोसिएशन च्या संवेदनशील परिवाराला ही माहिती समजली असता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी कै. ओमप्रकाश गुलाटी यांच्या स्मृती प्रित्यर्थ मांगे परिवाराकडे किराणा सुपूर्त करण्यात आले.
मांगे परिवारासाठी किराणा दिल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
या वेळी असोशिएशन चे तालुकाध्यक्ष राजेश धुमाळ, जिल्हा प्रतिनिधी सचिन शिंदे ,खजिनदार केरू वाकचौरे ,सेक्रेटरी महेश येवले , बाळासाहेब भोर, अरुण सावंत, रविंद्र कोटकर ,सचिन वाकचौरे व
मांगे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
अकोले तालुका केमिस्ट असोसिएशनने दिलेल्या मदतीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
