पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- सध्या 10 वी / 12 वीच्या परीक्षा जवळ आल्या असून परीक्षा देतांना कोणत्या टिप्स वापरल्या पाहिजे , परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर करियर करण्यासाठी कोणत्याही क्षेत्राची निवड करण्यासाठी कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे, आपले करियर आपण कसे निवडायचे, आत्मविश्वास कसा वाढवयाचा,आपले करियर यशस्वी कसे करायचे या बाबत रोटरी क्लब अकोले सेंट्रल व माईंड एक्सलन्स टेक्नोलोजीस अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने अगस्ति विद्यालय अकोले येथे व्याख्याते सुधीर फरगडे यांचे विद्यार्थ्यांना करियर गाईडन्स प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले. या वेळी अध्यक्ष स्थानी रोटरी क्लब चे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते होते.यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब चे सेक्रेटरी अमोल देशमुख, उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी,मुख्याध्यापक शिवाजी धुमाळ, पर्यवेक्षक श्री.शिंदे, श्री खांबेकर, शिक्षक घनश्याम माने, संजय पवार ,आर डी. नाईकवाडी,सौरभ पोखरकर आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुधीर फरगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपले करियर योग्य पद्धतीने ठरवता आल्याने अनेक विद्यार्थी आणि पालक नंतर निराश बनतात. अनेक विद्यार्थी मार्क्स किती मिळतात हे पाहून मग शाखा निवडू असा विचार करतात, परंतु विद्यार्थ्यांनी आधीच शाखा ठरवून त्यासाठी आवश्यक मार्क्स मिळवायला हवेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी शेवटी विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातील परीक्षेची भीती काढण्यासाठी त्यांच्या कडून थेरपीचे प्रॅक्टिकल करून घेतले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले.
यावेळी प्रास्ताविक करताना रोटरी क्लब चे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते यांनी रोटरी क्लब च्या कार्याचा आढावा घेतला व शालेय जीवनात विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची गोडी लागावी म्हणून अगस्ति विद्यालय येथे रोटरॅक्ट क्लब स्थापन करण्यासाठी व्यवस्थापनाशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.सूत्रसंचालन शिक्षक संजय पवार यांनी केले तर आभार घनश्याम माने यांनी मानले.

