पुन्य वार्ता
अकोले( प्रतिनिधी): ग्रामीण भागात आदिवासी घटकांसाठी काम करणाऱ्या आनंदगड शैक्षणिक संकुलात माहिती तंत्रज्ञानासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून जपानी तंत्रज्ञानाने शुद्ध पाणी उपलब्धतेसाठीचे प्रशिक्षण केंद्र वीरगाव येथे सुरू करण्यात येईल असे प्रतिपादन जपान येथील प्रथितयश व्यावसायिक एंजेल बँकेच्या मुख्याधिकारी श्रीमती रिको सॅक्यानु यांनी केले.
वीरगाव ता अकोले येथील आनंदगडावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे होते तर व्यासपीठावर प्राध्यापिका डॉ मुग्धा महाले, सचिव डॉ. अनिल रहाणे, संचालिका सुप्रिया वाकचौरे, गीता रहाणे,प्रा. डॉ. प्रतिक्षा रहाणे, अक्षय रहाणे, प्राचार्य किरण चौधरी, प्रा संदीप थोरात, दिनेश वाकचौरे, पिंगला तोरमल आदि होते.
जपान सरकार व एंजेल ग्रुप च्या माध्यमातून हवेतून शुद्ध पाणो मिळविण्याचे तंत्रज्ञांन विकसित करण्यात येणार असून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने त्याची सुरुवात वीरगाव पासून होईल तसेच या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण केंद्रदेखील येथे सुरू केले जाईल असेही श्रीमती रेको यांनी सांगितले. आनंदगडावरील विद्यार्थ्यांना जगातील इतर विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यासाठी विविध सॉफ्टवेअर व तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्याचे अभिवचनही त्यानी दिले. या शैक्षणिक संकुलाच्या विकासासाठी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचेही सुतोवाच त्यानी केले.
केमिकल, खते व इतर घटकांमुळे प्रदूषित पाण्यापासून मुक्ती म्हणून शुद्ध व स्वच्छ पाण्याचा स्रोत म्हणून हवेतून पाणी जमा करण्याचे तंत्रज्ञान त्यानी विकसित केले असून लवकरच ते कार्यान्वित होणार असल्याचे रिको यांनी सांगितले.

डॉ मुग्धा महाले यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास जीवन कसे सुकर होते व त्याच्या अतिरेकाचे दुष्परिणाम कसे होतात हे आपल्या भाषणातून विषद केले.मोबाईल हे दुधारी शस्त्र असून विद्यार्थ्यांनी त्याचा योग्य वापर केला तर सर्वांगीण विकास साध्य होतो पण गैरवापर व अतिरेक केल्यास त्याचे दुष्परिणाम सांगितले.
सचिव अनिल रहाणे यांनी स्वागत केले. श्रीमती उज्ज्वला धुमाळ यांनी प्रास्तविक ,संस्था परिचय व अतिथी परिचय दिला.सूत्रसंचलन विद्यार्थीनी कु. श्रद्धा वाळुंज व श्रीमती गव्हाळे यांनी तर आभार डॉ प्रतिक्षा रहाणे यांनी मानले.
विद्यार्थीनीनी सादर केलेले सुंदर स्वागत गीत , आकर्षक रांगोळी, फुलांची उधळण,आईच्या महतीचे गीत, लावणी नृत्य यांनी भारावून जात श्रीमती रिको यांनी देखील जाझ या जपानी शैलीतील गीते सादर करून मराठी व जपानी संस्कृतीचा मिलाफ घडवून आणला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा संदिप थोरात, रविंद्र आंबरे, देवीदास चारुडे, विवेक शेटे,पोपट दिघे, आकाश वर्पे, रामदास अस्वले,गोरक्ष पवार, दत्ता जगताप , श्री चिकने , श्री वर्पे, श्रीमती नफिसा शेख, अंजिरा देशमुख , अलका आहेर, उषा गुंजाळ,शिल्पा देशमुख, सीमा दिघे, सोनाली आहेर,कविता दातीर, माया आंबरे, अश्विनी गिरी,स्वप्नाली बलसराफ आदिनी सहकार्य केले.


