पुण्य वार्ता
विषेश प्रतिनिधी
कोतुळ /अकोले
पोलीस काका माझ्या आईला आणा ना ! ही हृदय पिळवटून टाकणाऱ्या पाच वर्षीय पियुषची हाक ऐकली की दगडाला ही पाझर फुटल्याशिवाय रहात नाही,
8 फेब्रुवारी 2024 रोजी गोवंडीच्या रफिकनगर मध्ये पियुष रडत उभा होता, त्याला त्याचा पत्ता सांगता येत नव्हता, पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत जवळ घेत त्याच्या आईवडिलांची चौकशी केली, बाळ तुझे नाव काय,,,,, त्याने सांगितले पियुष , आईचे नाव काय,,, त्याला सांगता आलेच नाही, बाबांचे नाव ,,,पुन्हा शांतता,,,,,मुलगा मराठी भाषा समजतोय म्हणजे हा मराठी असला पाहिजे,
हा तर्क शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसन हेमाजी आंबवणे यांनी बांधला, त्याला बस चे व लोकलचे फोटो दाखविले तेव्हा हा लोकलने आल्याचे समजले,
शेकडो गुन्हेगारांना जेरीस आणणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यातली मानवता आता मात्र जागी झाली, आणी क्षणाचाही विलंब न लावता मी पियुषचे आई वडील शोधून काढायचेच हा चंग मनाशी बांधला,
शोध सुरू झाला, बालन्यायालयाच्या आदेशाने त्याला मानखुर्द येथिल बाल आश्रमात पाठविण्यात आले,
एक वर्षांपासून अविरतपणे हा पोलीस अधिकारी पियुषच्या आई वडिलांना शोधतोय,
पोलीस निरीक्षक आंबवने यांनी शिवाजीनगर, देवनार,मानखुर्द येथील गल्ली बोळ पालथा घातला कोपरा न कोपरा छानून झाला,
पण आजपर्यंत मात्र त्यांना पियुषचे आई वडील मिळून आले नाही मात्र खचून न जाता त्यांचे हे शोध कार्य अजूनही चालूच आहे, पोलीस निरीक्षक आंबवणे यांच्या या संघर्षमय प्रवासात समाजाने पुढे येण्याची आज खरी गरज आहे, जर कुणाला या बाबद काही माहिती असेल तर *
शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा
मला पाहून हसतो, मात्र जाताना रडतो—–
आंबवणे व त्यांचे सहकारी वारंवार मानखुर्दच्या बाल आश्रमात जातात, प्रत्येक भेटीत पियुष त्यांना आनंदाने भेटतो, मात्र ते मागे फिरल्यावर तू गुमसुम होतो, आणी मग तो आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देतो, काळजाला छिद्रे पडल्याचा भास होतो,,,, आणी मग आयुषच्या आईवडिलांना शोधण्याचा निर्धार अधिक पक्का होतो ,असे आंबवणे सांगतात,
स्वखर्चाने शोध मोहीम——
पियुषच्या आईवडिलांना शोधण्यासाठी वृत्त पत्रातून ते माहिती व जाहिरात देतात ,मीडियाशी संपर्क साधून पियुषचा फोटोही टाकतात
व्हाटस अप वर पोस्ट लिहितात
आई तुला शोधतोय मी—–
आजही पियुषचे डोळे केविलवाण्या नजरेतून खिडकीबाहेर डोकावून आईची वाट पाहतात, कोणीतरी त्याच्या आईला घेऊन येईल , ही आशा त्या चिमुकल्याच्या डोळ्यातून दिसते, आंबवणे सारख्या पोलीस अधिकाऱ्याने एका बालकाला कर्तव्य म्हणून नव्हे,तर जिवंत माणुसकीच्या नात्याने जवळ केलंय,
खरोखर झोपलेला परमेश्वर पियुषची आणी पोलीस निरीक्षक आंबवणे यांची आर्त हाक ऐकेल का,,,,,,,,,,,,,??????
