पुण्य वार्ता
अकोले ( प्रतिनिधी):
महाराष्ट्र युवा खेल परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज,आनंदगड,विरगाव च्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादित करत ११ सुवर्णपदक, रौप्यपदकांसह कबड्डी चषक मिळवत आनंदगड शैक्षणिक संकुलाची गौरवशाली परंपरा अबाधित राखली आहे.
जिल्हा क्रीडा संकुल सोलापूर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये १०० मीटर धावणे या स्पर्धेत कुमारी उंबरे संजना दत्तू या विद्यार्थिनीने वयोगट-१७ मधून सुवर्णपदक पटकाविले
गोळा फेक वयोगट-१७ मधून कुमारी विद्या बाळू झोले हिने सुवर्ण तर कुमारी धनश्री भरत मेंगाळ हिने रौप्य पदक पटकविले
४×१००मीटर रिले वयोगट-१७ मधून कुमारी कोमल गोपीनाथ बांडे,कुमारी प्राजक्ता ज्ञानेश्वर शेळके,कुमारी संजना दत्तू उंबरे,कुमारी विद्या बाळू झोले,कुमारी दामिनी संतोष भांगरे यांनी सुवर्णपदक पटकविले तर वयोगट-१७ कबड्डी मुलींचा संघ कुमारी कोमल गोपीनाथ बांडे कुमारी प्राजक्ता ज्ञानेश्वर शेळके कुमारी धनश्री भरत मेंगाळ कुमारी विद्या बाळू झोले कुमारी दामिनी संतोष भांगरे यांनी सुवर्णपदक पटकाविले
या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक विवेक शेटे यांचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी खेळाडूंचे आनंदगड शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे संस्थापक सचिव डॉ.अनिल रहाणे, संचालिका सौ.सुप्रिया वाकचौरे, सौ.गीता राहणे, प्राचार्य किरण चौधरी, रवींद्र आंबरे प्रा.संदीप थोरात सौ.अलका आहेर प्रियांका सोनवणे अंजीरा देशमुख यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले यशस्वी विद्यार्थिनींचे परिसरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे

